Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या"जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला..."; किरीट सोमय्यांच्या Viral Video प्रकरणावर संजय...

“जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला…”; किरीट सोमय्यांच्या Viral Video प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, “जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका.” नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे. जय महाराष्ट्र!” असे त्यांनी म्हटले आहे.

Monsoon Session Live Updates : आज अधिवेशनाचा दुसरा दिवस, विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

राऊत यांनी पहिल्यांदाच किरीट सोमय्या प्रकरणावर भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी थेट उल्लेख टाळला असला तरी त्यांनी या विधानातून सोमय्यांकडेच इशारा केल्याचे दिसून येते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Kirit Somaiya : आक्षेपार्ह Video वर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या