Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : 'इंडिया आघाडी'चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : ‘इंडिया आघाडी’चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | Mumbai

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने तर २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार (Prime Minister Candidate) नरेंद्र मोदी हेच असतील, अशी घोषणा देखील केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? याबाबत अद्यापही सांशकता आहे.

- Advertisement -

‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra ने इतिहास रचला! पाकिस्तानच्या नदीमला हरवत ‘सुवर्ण’ कमाई

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या (India Alliance) पहिल्या दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बंगळूरु (Patna and Bangalore) येथे झाल्या आहेत. त्यानंतर इंडिया आघाडी’ची तिसरी बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईच्या (Mumbai) बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीचे यजमान उद्धव ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण आणि समन्वय समितीची घोषणा होईल. विशेष म्हणजे आघाडीचा नेता याच बैठकीच घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं

तर इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरणाबाबत माहिती देतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचा लोगो भारतीयांसाठी प्रेरणादायी असणार आहे. त्याचं अनावरण ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता होईल. देशातील जनता आणि युवकांना प्रेरणा मिळेल, असे लोगोचे डिझाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राऊतांनी दिली.

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

दरम्यान, इंडिया आघाडीसोबत बंगळूरुच्या बैठकीत २६ पक्ष सहभागी झाले होते. त्यात आता आणखी पक्ष वाढणार असल्याचे आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील एनडीएची नव्याने बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. एनडीएमध्ये ३८ पक्ष असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आमदार बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या विरोधात दंड थोपटणार; या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवणार

- Advertisment -

ताज्या बातम्या