मुंबई । Mumbai
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलींचा विनय भंग झाला. गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांना राजकारणातून मंत्रीपदाकडे पाहायला, जनतेचे प्रश्न पाहायला वेळच मिळत नाही. विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुडे हे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी मोठ सामाजिक काम महाराष्ट्रात उभे केले आहे असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले आज दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर विद्यमान उपमुख्यमंत्र्यांसोबतचा विनयभंग करणाऱ्याचा फोटो छापला आहे. महाराष्ट्रात सत्तेच्या बळावर काय पेरताय असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. जिथे सत्ता तिथे बलात्कारी, व्यभिचारी, खूनी, हत्यारे आहेत असेही ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, ‘काल आम्ही ठाण्याला गेलो होतो. तिथे काही गुंडांनी आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अडवलं. आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आनंद दिघे यांचा तो आश्रम आणि त्या आश्रमाची संपूर्ण मालमत्ता एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. तिथे त्यांचे गुंड होते. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला होता.
काल आमच्यावर हल्ला करणारे व जळगावात रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे लोक एकाच प्रवृत्तीचे होते. त्याच पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आणि हे वारसदार म्हणून मिरवतायत. हे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचा वारसा सांगत आहेत. जसा नेता तशी पोरं. माझी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की त्यांनी या प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा., असाही ते म्हणाले.