Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याअद्वय हिरेंच्या अटकेनंतर संजय राऊत आक्रमक; म्हणाले...

अद्वय हिरेंच्या अटकेनंतर संजय राऊत आक्रमक; म्हणाले…

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) बनावट दस्तऐवज आणि बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काल भोपाळमधून (Bhopal) ताब्यात घेतले. त्यानंतर आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकार आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.

- Advertisement -

Anushka Sharma : “माझं भाग्य आहे की…”; विराट कोहलीच्या ५० व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास पोस्ट

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील प्रमुख नेते भाऊसाहेब हिरे यांचे अद्वय हिरे नातू आहेत. पण, अद्वय हिरे यांची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. त्यांच्यावरील आरोप भाजपात (BJP) असताना आणि त्याआधीही होते. पण, शिवसेनेत आल्यावर मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा घेतली आणि मतदारसंघ ढवळून काढला. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत,” असा आरोप संजय राऊतांनी भुसेंवर केला आहे.

Advay Hiray : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना भोपाळमधून अटक

पुढे ते म्हणाले की, “गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर (Dada Bhuse) आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रूपयांचे मनी लाँडरिंग झाले आहे. याबद्दल ईडी, सीबीआय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे दिले. तिथे आजही शेतकरी आंदोलन करत आहे,” असे म्हणत संजय राऊतांनी राहुल कूल यांनाही लक्ष्य केले आहे.

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जीएसटी आयुक्तपदी आशीष शर्मा

ते पुढे म्हणाले की, “७० हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. ते अजित पवार आज मंत्रीमंडळात (Cabinet) आहेत. तेच अजित पवार गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसले होते,” असे सांगत संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच हसन मुश्रीफ यांनी संत संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपाने केला. मुश्रीफ सध्या जामीनावर सुटले आहेत. ईडी, सीबीआयची प्रकरणे असलेली शिवसेनेची लोक सरकारमध्ये आहेत. या लोकांवर कुठलीही कारवाई होत नाही. पण, अद्वय हिरेंना अटक करून सरकारने दाखवून दिले की आम्ही सुडाचे आणि दबावाचे राजकारण आहे. अद्वय हिरेंनी मालेगावची (Malegaon) विधानसभा लढू नये, म्हणून दबाव होता. अद्वय हिरेंच्या पाठिशी संपूर्ण शिवसेना आहे,” असेही संजय राऊतांनी सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Kartiki Ekadashi 2023 : आनंदाची बातमी! आजपासून विठ्ठल रखुमाईचे २४ तास दर्शन

- Advertisment -

ताज्या बातम्या