मुंबई | Mumbai
राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपावरील फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मविआ एकत्रच लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मविआमध्ये अंतर्गत वाद असले तरी मविआमधील एकजूट ही मजबूत असल्याचे वारंवार सांगण्यात येत असते. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलेले आहे. जिंकेल त्याची जागा असा महाविकास आघाडीने फॉर्म्युला ठरवलेला असून प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र मविआ मजबूत आहे. मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार आहे. अनेकांना जागावाटपात तडजोड कराव्या लागतील. ते करायला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागावाटपावरील मतभेद उघड करायचे नाहीत. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे.
कोपरगावमध्ये आ.काळे-कोल्हेंमध्ये जोरदार राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबई विद्यापीठ प्रशासनानं सिनेट निवडणूक रद्द झाल्या आहेत. यावरू संजय राऊत म्हणाले, सिनेटची निवडणूक रद्द केली यात आश्चर्य वाटावं असं काहीही नाही. राज्यातलं सरकार भीतीपोटी कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेचं पॅनल १०० टक्के जिंकणार होतं. या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या. आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? तुम्ही महापालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाहीत. उद्या या भीतीपोटी तुम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळी घेणार नाहीत का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
तसेच, आतापर्यंत I. N. D. I. A. आघाडीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, ज्या दोन राज्यांमध्ये या बैठका झाल्या, त्यातील बिहारमध्ये नितीश कुमार यांची तर दुसरीकडे काँग्रेसची सत्ता होती. मुंबईत मात्र, आमची सत्ता नाही. तरी देखील देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आम्ही ही बैठक घेत आहोत, हे विशेष असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. हे आव्हान आम्ही सत्तेशिवाय स्विकारत असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. या बैठकीला सहा मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री अनेक देशातील प्रमुख नेते एकत्र येत असल्याचे ते म्हणाले. अनेक महत्त्वाच्या निर्णयावर या वेळी चर्चाच होणार नाही तर निर्णय देखील घेतले जाणार असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
‘एमबीबीएस’ अॅडमिशनच्या नादात घातले साडे बारा लाख