Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; संजय राऊतांच्या विधानाने...

Sanjay Raut : ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; संजय राऊतांच्या विधानाने चर्चेला उधाण

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election) बिगुल वाजले असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान (Voting) आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने तयारी सुरु आहे. निवडणुकीची आचारसहिंता जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत चर्चा सुरु असून दोन्ही युत्या-आघाड्यांतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, अजूनही जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे युती आणि आघाडीचे जागावाटपाचे घोडे नेमके कुठे अडले आहे, असा प्रश्न विचारला जात असून कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

अशातच काल मविआची जागावाटपाबाबत (Seat Sharing) १० तास बैठक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र, या बैठकीत जागावाटपासंदर्भात ठोस निर्णय न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून आज दुपारी १२.३० वाजता पक्षातील महत्वाच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. त्यामुळे ठाकरे गट जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने मविआतून बाहेर तर पडणार नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : लक्झरी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; ८ चिमुकल्यांसह ११ जणांचा मृत्यू

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “काल आमची जागावाटपाबाबत मुंबईत (Mumbai) बैठक झाली. या बैठकीनंतर माझी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आज साडे बारा वाजता त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील”, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे आता या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर २६ तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचे आहे. खरं म्हणजे इतका कमी वेळ सरकार स्थापन करण्यासाठी दिला जात आहे.४८ तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागणार आहे. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागणार आहे. निकालानंतरच्या ४८ तासांत सरकार बनले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावून सरकार चालवण्याचा अमित शाह (Amit Shah) यांचा डाव असल्याचे”, त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा?

भाजपकडून मतदार यादीत घोटाळा, मुख्य सूत्रधार अमित शाह

भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप मतदार यादीत घोटाळा करत आहे. भाजप ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या साधारण दीडशे मतदारसंघाच्या यादीत महाविकास आघाडीच्या पक्क्या मतदारांची यादी काढायची आणि खोटे आधार कार्ड, खोटे ओळखपत्र या माध्यमातून दहा हजार बोगस नावे टाकण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत हा सर्वात मोठा घोटाळा मतदार यादीच्या माध्यमातून होत आहे. निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोग भाजपला अशाप्रकारे मदत करत असेल तर मला वाटतं की, या देशातील लोकशाहीची हत्या झाली असून अमित शाह हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या