Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्याराहुल नार्वेकर चोरांचे सरदार झालेय; संजय राऊतांचा हल्लाबोल

राहुल नार्वेकर चोरांचे सरदार झालेय; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही राहुल नार्वेकर या आमदार अपात्रता प्रकरणी टाईमपास करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, शिवसेनेचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असा सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वारंवार आदेश देत आहे. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती घटनात्मक पद्धतीने झालेली नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. एवढं सगळं होऊन देखील विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेत नाही. विधानसभा अध्यक्ष टाइमपास 1, टाइमपास 2, टाईमपास 3 वेब सिरीज बनवत आहेत. शिंदे आणि त्यांचे आमदार चोर आणि लफंगे आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांना संरक्षण देत आहे. ते चोरांचे सरदार झाले आहे. विधानसभा अध्यक्ष हे एक मोठं आणि संविधानात्मक पद आहे. मात्र सध्याचे अध्यक्ष चोरांचे सरदार झाले आहे. ते संविधान आणि कायदा मानायला तयार नाही. चोरांना संरक्षण देणं हा त्यांचा अधिकार आहे का? असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचे 40 आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे साधारण तितकेच आमदार अजित पवारांसह पुर्णपणे, बेकायदेशीरपणे मुळ घराची लूट आणि चोऱ्या करून तिथे दुसऱ्या घकात शिरले आहेत आणि त्या चोरांना, त्या दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील तर राहुल नार्वेकर यांचे नाव विधानसभा अध्यक्ष म्हणून या देशाच्या आणि राज्याच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल. भगतसिंग कोश्यारी नंतर राहुल नार्वेकर हे नाव काळ्याकुट्ट इतिहासात नोंदविण्यात येईल. उद्या ते जेव्हा खुर्चीवर नसतील तर अशा व्यक्तींना महाराष्ट्रातील रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल. या राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश;...

0
मुंबई | Mumbai कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर...