Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यानव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट; संजय राऊत म्हणाले,...

नव्या संसद भवनात प्रफुल्ल पटेल अन् शरद पवारांची भेट; संजय राऊत म्हणाले,…

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात मंगळवारी नव्या संसद भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या दोन्ही नेत्यांचा एकत्रित फोटो समोर आला आहे. यावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी विधान केले आहे.

- Advertisement -

पत्रकारांनी बुधवारी याविषयी संजय राऊत यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. पवार व पटेलांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर राऊत म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत? हे मला माहिती नाही. पण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत हे मला माहिती आहेत. शरद पवारा यांनी त्यांच्या पक्षातील फुटीर गटाविरोधात निवडणूक आयोग व न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

प्रफुल्ल पटेल यांनी केली होती शरद पवारांवर टीका

राज्याच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी मोठा भूकंप झाला होता. कारण याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकार पाठिंबा दिला. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांची महत्वाची भूमिका होती, असं सांगितलं जात. त्यानंतर आता हे दोन्ही नेते नव्या संसद भवनात एकत्र आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या