Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSanjay Raut : “गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं, म्हणून ते…”;...

Sanjay Raut : “गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं, म्हणून ते…”; राऊतांचा खळबळजनक दावा

धुळे । Dhule

“मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जाऊन आणखी खळबळजनक दावा केला आहे.

- Advertisement -

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नितीन देशमुख यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “हो, जवळजवळ तसाच प्रयत्न झाला. अनेक आमदार आहेत, ज्यांना गुंगीच औषध देण्यात आलं. बधीर करण्यात आलं. नितिन देशमुख तिथून पळून आले. आमचे अजून आमदार आहेते जे तिथे गेल्यावर गुंगीमध्ये होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांकडे होता. आमदार खासगीमध्ये सांगतात, खाण्यातून, पेयातून काहीतरी दिलं जात होतं. सात-आठ दिवस काय चाललय ते कळत नव्हतं. काही आमदारांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. पण आता हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात लोकसभेला व्होट जिहाद झाल्याचा दावा केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, वोट जिहादवर आरएसएस, भाजपा फेक नरेटिकव्ह सेट करतय. वोट जिहाद काय असतं? त्यावर श्वेतपत्रिका काढावी लागेल. भाजपा निवडणूक हरले की वोट जिहाद, एखाद्या मतदारसंघात मुस्लिमांनी मतदान केलं की, वोट जिहाद नाही का? असं सवाल उलट राऊत यांनी केला. तसेच, या देशात सगळ्या जाती धर्माचे मतदार आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढलाय का? कोणाला मतदान करायचा हा त्यांचा अधिकार. २०१४ आणि त्याआधी उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने मोदींना मोठ मतदान केलं होतं. तुम्ही आकडे पाहा, त्याला काय म्हणालं असं संजय राऊत म्हणाले.

वाशिम दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच निमंत्रण नसल्याने आमदार नाराज असल्याबाबत संजय राऊत यांनी बोलताना आमच्या खासदारांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाचा कोट्यवधी पैसा खर्च करून भाजपचा प्रचारासाठी दौरे करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर पक्षाचा प्रचार करण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीतच काढून यावेत असे देखील विधान संजय राऊत यांनी केले आहे, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, जर निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी याबाबत दखल घेतली पाहिजे असे देखील मत राऊत यांनी व्यक्त केले आहेत, नरेंद्र मोदी हे संपूर्ण भाजपाचे पण नाही तर भाजपातील एका विशिष्ट गटाचे पंतप्रधान आहेत असा देखील आरोप संजय राऊत यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...