मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं तयार करणारा कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. कुणाल कामराने ज्या क्लबमध्ये शो केला त्या शोमध्ये शिंदेंवर टीका केल्याने खारमधील हा क्लब रात्री शिवसैनिकांनी फोडला आहे. या गाण्यात कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर खोचक टोलेबाजी केली आहे. मधल्या काळात फुटलेले पक्ष आणि तयार झालेली नवीन राजकीय समीकरणे यावर कुणाल कामराने भाष्य केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांना अप्रत्यक्षपणे गद्दार म्हटले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या गाण्याचे समर्थन केले आहे. त्यांनी कुणाल कामराचे गाणे रिट्विट करत ‘कुणाल की कमाल, जय महाराष्ट्र’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमधून त्यांनी शिंदे गटावर टोलेबाजी केली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात, असेही राऊतांनी म्हटले.
काय म्हणाले संजय राऊत?
कामराच्या स्टुडिओचे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकसान केल्यानंतर संजय राऊत म्हणाले, कुणाल कामरा हे प्रसिद्ध लेखक आणि स्टँड अप कॉमेडियन आहेत. कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंगात्मक गाणे लिहिले, तर शिंदे गटाला मिरची लागली. त्यांच्या लोकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. देवेंद्रजी, तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात, अशी पोस्ट राऊतांनी केली.
आमदार आदित्य ठाकरेंची टीका
आदित्य ठाकरेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करताना कुणाल कामराने केलेले गाणे 100 टक्के खरे असल्याचे म्हटले आहे. “एकनाथ मिधेंबद्दल कुणाल कामराने केलेले गाणे 100 टक्के खरे आहे. मिंधेंच्या भित्र्या टोळीने कॉमेडियन कुणाल कामराने ज्या शोच्या स्टेजवर कार्यक्रम सादर केला. एका गाण्यावर केवळ सुरक्षित वाटणारे भित्रे लोक अशाप्रकारे व्यक्त होऊ शकतात,” असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
“बरे राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. “एकनाथ मिंधेंकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमी लेखण्याचा हा प्रयत्न झाला,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
कुणाल कामराचे नेमके गाणे काय होते?
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आंखो पे चष्मा, हाये,
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आंखो पे चष्मा, हाये,
एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए.
मेरी नजर सें तुम देखो तो, गद्दार नजर ओ आए
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आंखो पे चष्मा, हाये,
मंत्री नही ओ दलबदलू है, और कहा क्या जाए
जिस थाली में खाए उस थाली मेंही छेद कर जाए
मंत्रालय सें ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा