Wednesday, October 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMNS Dadar-Mahim Constituency Fight : माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? संजय राऊत...

MNS Dadar-Mahim Constituency Fight : माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? संजय राऊत स्पष्टच बोलले, शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी

मुंबई | Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना आणि मनसेने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आता महाविकास आघाडीची यादी कधी जाहीर होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. अमित ठाकरेंना मनसेने माहिमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटानेही अमित ठाकरेंविरोधात आपला उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता ठाकरे गटाकडूनही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

मनसेने अमित ठाकरे यांना माहीम दादर विधानसभा मतदारासंघातून निवडणुकीसाठी उभं केलं आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार असून शिंदे गटाने यावेळी त्यांनाच उमेदावारी दिली आहे. त्यामुळे सुरुवातीला अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत होणार असे म्हटले जात होते. मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मतदारसंघातून आपणही उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अनेकदा वर्षोनवर्षे निवडणूक लढवून अनेकांना यश प्राप्त होत नाही. ते पक्ष सुद्धा थांबत नाही म्हणून त्यांनी निवडणूक लढू नये असे आम्ही कधी म्हणणार नाही. अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचे स्वागत करावे ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आली आहे. दादर माहीम मतदारसंघामध्ये शिवसेनेची स्थापना झाली. जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होत नाही. शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. आम्ही निवडणूक लढताना राजकारणात कोणतेही आव्हान आले तरी ते स्विकारुन उभे असतात”, असे संजय राऊत म्हणाले.

माहीम मध्ये तिरंगी लढत?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकांच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचेही नाव असून त्यांना दादर- माहिम विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या यादीनंतर काही तासातच शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवार यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये सदा सरवणकर यांना अमित ठाकरेंविरोधात तिकीट मिळाले. अशातच आता शिवसेना ठाकरे गटही याठिकाणी उमेदवार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या