Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSanjay Raut : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय; संजय राऊत यांचा...

Sanjay Raut : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (२३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीसह इतर सर्वच पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. . याबाबत आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडलं त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांनी लवकर निर्णय द्यायला हवा होता. आमदार अपात्रतेचा निर्णय द्यायला हवा होता. मग तुम्ही कशाला बसलाय. तुम्ही निर्णय देत नसाल तर खुर्च्या कशासाठी उबवताय. जनतेच्या पैशांचा चुराडा कशाला करताय.सरकारवर का ओझं बनताय? असा प्रश्नही राऊतांनी विचारला. निकालाला, दुर्घटनेला चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल असा घणाघातही राऊतांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे चंद्रचूड हे प्राध्यापक म्हणून ते भाषणं द्यायला चांगले आहेत. पण सरन्यायाधिश म्हणून घटनात्मक पेचावर ते निर्णय देऊ शकलेले नाहीत. यासाठी इतिहास त्यांना माफ करू शकणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे चित्र दिसतंय ते चित्र नक्कीच दिसलं नसतं. त्यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराचे दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. आता सुद्धा कुणी कुठे कशाही उड्या मारू शकेल. कारण लोकांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...