Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा" - संजय राऊत

Sanjay Raut : “…तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा” – संजय राऊत

नाशिक | Nashik

बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.अशातच आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “बदलापूर (Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) पोलिसांची (Police) बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करत असेल तर महाराष्ट्रातील पोलीस एवढे लेचेपेचे आहेत का? असा सवाल करत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी केली. तसेच आरोपी अक्षय शिंदे याने आपल्या जबाबात काही खुलासे केले होते ते खुलासे समोर येऊ नये म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यात आला”, असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

हे देखील वाचा : “अक्षयचे हात बांधलेले, तोंडावर बुरखा होता, कुणाला वाचविण्यासाठी…”; VIDEO शेअर करत संजय राऊतांचा आरोपांचा भडीमार

पुढे बोलतांना ते म्हणले की,”पोलिसांच्या कमरेवरची बंदुक हिसकावणार. ती लॉक झालेली बंदुक फायर करणार हे कोणाला पटेल का? हे कोणाला पटू शकतं का? संडास साफ करणारा पोरगा कधीपासून बंदुक चालवायला लागला? असा सवालही संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात उपस्थित केला. तसेच शाळेचे सीसीटीव्ही फुटेज का काढलं? साीसीटीव्ही फुटेज ज्याला मारलं त्याने काढलेले नाही. शाळेच्या संस्था चालकाने ते फुटेज काढून टाकले. ही शाळेची संस्था भाजपशी (BJP) संबंधित आहे. हे सगळे शिंदे, फडणवीसांशी संबंधित आहेत. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला गेला” असेही संजय राऊतांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या