पुणे | Pune
रामदास कदम हे भरवशाचे माणूस नव्हते. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोनवेळा विधानपरिषदेवर पाठवले. नीलम गोऱ्हे आणि कदम यांना विधान परिषदेवर पाठवण्यास विरोध होता, असे मत मांडत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम संधी दिली. आज ते जे गरळ ओकतायेत. “उद्धव ठाकरे हे दयाबुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे रामदास कदम यांना 12 वर्षे विधान परिषदेवर पाठवले. अशा माणसाने कृतज्ञ असले पाहिजे. ही लोक बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करत आहेत. त्याची जबर किंमत कदम यांना मोजावी लागेल. मग ही किंमत कायदेशीर, भावनिक किंवा अन्य कोणतीही असेल. यांना लाजा वाटल्या पाहिजे. मी शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. हे लोक कुठे होते?”. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असे त्यांनी सांगितले.
दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवण्यासा शिवसेनेतील लोकांचा सातत्याने विरोध होता, एक म्हणजे रामदास कदम आणि दुसऱ्या नीलम गोऱ्हे.नीलम गोऱ्हेंचं पक्षातलं योगदान काय हा प्रश्न कायम विचारला गेला. आणि रामदास कदम यांना आमदार, मंत्री म्हणून इतके वर्षं संधी मिळाली आहे, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवायचे, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना पक्षातून विचारले गेले.
पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते?
आज १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवून दिले. रामदास कदम यांनी पक्षात काम केले, त्यांनाही पक्षाने भरपूर दिले. खासकरून उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना दिले. विरोधी पक्षनेते पद, मंत्रिपद हे उद्धव ठाकरेंनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जेव्हा पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. तेव्हा बाळासाहेबांसोबत काम करणाऱ्या या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने वागणूक दिली असे संजय राऊत यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




