Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शाह-जयंत पाटील यांच्या भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांचे विधान; म्हणाले, "आमचा अन्...

अमित शाह-जयंत पाटील यांच्या भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांचे विधान; म्हणाले, “आमचा अन् त्यांचा DNA एक, आम्ही…”

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा पार पडला आहे. या दौऱ्यात त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी चर्चा झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, आपला नेता आणि पक्ष अडचणीत असताना पळून जाणारा नेता जयंत पाटील नाहीत. आमचा आणि त्यांचा DNA एक आहे.  आम्ही पळपूट आणि डरपोक नाहीत. आम्ही लढणारे आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, त्यांना जास्त सिरीयस घेऊ नका. सध्या एकमेकांवर फुलं उधळण्याचे काम सुरू आहेत. पण त्यांच्यात अंतर्गत काय सुरू आहे हे आम्हाला माहित, असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.

“देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

ते पुढे म्हणाले की, या देशात संसद, विधिमंडळ हे उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणुकीत भाजपने दिली होती. तेच भाजप आता अधिकार काढून घेत आहेत. आता सगळा कारभार नोकरशहाच्या हाती देत आहेत.

राज्यपालांच्या हाती तुम्ही कारभार देणार आहे. राज्यपाल महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणात दिसतात. बाकी कुठं दिसत नाहीत. आम्ही दिल्ली सेवा विधेयकाला विरोध करणार आहोत, असे राऊत म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात याचिका दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या