मुंबई । Mumbai
कल्याणच्या एका सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मनसेनं मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठी माणसे घाणेरडी आहेत, त्यांन जगण्याचा अधिकार नाही. मराठी माणसांना जागा नाकारण्यात येत आहेत. लोढा, गुंडेचा लवकरच पुढे नावे घेईल. बाळासाहेब ठाकरेंनी मराठा माणसासाठी निर्माण केलेली शिवसेना नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फोडून मराठी माणूस कमजोर केला. यासाठीच मराठी माणसाला दुय्यम दर्जीची वागणूक मिळावी आणि लढण्याची ताकद नष्ट व्हावी. ही मुंबई आणि आजूबाजूचा परिसर अदानी, लोढा, गुंडेचा अमराठी बिल्डर व्यापाऱ्यांच्या घशात घालावा यासाठी भाजपने मराठी माणसाला कमजोर केल्याची टीका संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी कल्याणमधील प्रकारावरून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. स्वत:ला जे शिवसेना समजतायत, मोदी-शाहांनी ज्यांच्या हातात शिवसेना चिन्ह दिलं, त्या नामर्द लोकांना कालची कल्याणमधील घटना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाबाबत ज्यांना वेदना आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे. एकनाथ शिंदे नामर्द आहेत. सत्तेसाठी लाचार आहेत. काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही स्वत:ला कसले मराठी समजता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.