Friday, April 25, 2025
HomeराजकीयMaharashtra Politics : “वो डरा हुआ आदमी है…”; संजय राऊत यांच्या निशाण्यावर...

Maharashtra Politics : “वो डरा हुआ आदमी है…”; संजय राऊत यांच्या निशाण्यावर नेमकं कोण?

मुंबई । Mumbai

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमामध्ये खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कोणाची हे स्पष्ट झाले असल्याचे सांगितले आहे. यावरुन आता राजकारण रंगले आहे. अमित शाह यांच्या या टोलाचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

- Advertisement -

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह लोहपुरूष मग सरदार वल्लभभाई पटेल कोण?, बाळासाहेब ठाकरे कोण? ‘वो डरा हुआ आदमी’, असा पलटवार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. सत्तेतील मंडळी ही लाचार आणि डरपोक आहे. अमित शाह सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कोणती आणि खोटी कोणती हे कळेल. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.

खासदार राऊत म्हणाले की, सत्तेतील मंडळी ही लाचार आणि डरपोक आहे, असे ताशेरे त्यांनी ओढले. अमित शाह जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा खरी शिवसेना कोणती आणि खोटी कोणती हे कळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, की शाह सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल, आज दहशत, पैशाची ताकद, निवडणूक आयोग हातात यामुळे हे घडल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केले. याबाबत राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरावे आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात घुसून त्यांनी चोऱ्यामाऱ्या करत पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही. एक ना एक दिवस सर्वांना जावेच लागेल, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळ म्हणजेच एसटीच्या बसवर हल्ला करण्यात आला. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त बैठक घेत, चर्चेतून त्यावर तोडगा काढावा. हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयीची जबाबदारी असताना अटकेच्या भीतीने ते बेळगावला जात नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात घुसून त्यांनी चोऱ्यामाऱ्या करत पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला अमित शाह यांची दादगिरी दाखवू नका. ते काही अमृत पिऊन आले नाही. जनता त्यांचा फैसला करेल, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...