Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्याShivsena Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | Mumbai

यंदाचा दसरा मेळावा दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर शिवसेनेच्या कोणत्या गटाचा होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. परंतु शिंदे आणि ठाकरे गटाने मुंबई महानगपालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. तसेच आमचा गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदनावर होणार असे दावे-प्रतिदावे दोन्ही गटाकडून करण्यात येत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेच्या (Shivsena) कोणत्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर यांनी काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा. कारण सरकार म्हणून आम्ही कधी कोणावर दबाव टाकलेला नाही. जे लोकं आरोप करत आहेत की, दबावाचं राजकारण आम्ही करतो, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनला बोलावून परवानगी दे, हे आम्हाला म्हणायला एक सेकंदही लागणार नाही. परंतु जे योग्य असेल तो निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरने घ्यावा.

कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव हा अधिकाऱ्यावर या बाबतीत असू नये, ही आमची भूमिका आहे. जर त्यांनी परवानगी नाकारली किंवा कोणी आम्हाला मिळालेल्या परवानगीच्या विरोधात न्यायालयात गेलं तर पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही दोन-तीन ठिकाणच्या जागा ऐनवेळाला धावपळ होऊ नये यासाठी निश्चित केलेल्या आहेत. शिवसेना प्रमुखांचे विचार मांडण्यासाठी, शिवसेना प्रमुखांची शिवशाही यामागे त्या दिवसाला असलेलं महत्त्व हे आम्ही कायम राखणार आहोत. म्हणून आमचा मेळावा हा दमदणीत होणार आहे, असा विश्वासही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला.

दसरा मेळाव्यासाठी तुम्ही दोन-तीन जागा बघितल्या आहेत, परंतु ठाकरे गट कोणताच प्रयत्न करताना दिसत नाही. या प्रश्नावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, त्यांना दसरा मेळावा झाला नाही, तरी फरक पडत नाही. परंतु आम्हाला दसरा मेळावा करायचा आहे, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी काय करावं आणि काय नाही करावं, हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्ही सर्व बाबतीत तयारी करत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या