मुंबई – Mumbai
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 11 ऑगस्ट रोजी चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला. आता संजय दत्त आपल्या पत्नीसह परदेशात रवाना झाला आहे.
फुप्फुसाचा कर्करोगावर मुंबईत उपचार घेतल्यानंतर संजय दत्त आपल्या पत्नीसह दुबईला रवाना झाला आहे. संजूबाबाच्या प्रकृतीसाठी बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याचे चाहते चिंतातूर झाले आहे.
संजय दत्त आपल्या पत्नी मान्यतासह 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतून दुबईला रवाना झाला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मुलं शहरान आणि इकरा संजय दत्तला भेटण्यासाठी अतूर झाले होते, त्यांना भेटण्यासाठी संजय दत्त दुबईला रवाना झाला. ते काही दिवस दुबईत राहणार आहे, त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतणार आहे.
संजय दत्तने स्वत: आपल्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती, त्यानंतर फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले.