Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधसंक्रांत म्हणजे तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा…

संक्रांत म्हणजे तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा…

भारतात विविध प्रांतात विविध नावाने, वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये पोंगल, लोहरी अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. त्यादिवशीचे आकाश लाल, पिवळ्या, निळ्या विविध रंगांनी सजलेले असते. संक्रांतीचा हा उत्साह कितीतरी दिवस मनात रेंगाळत राहतो. अशा उत्साहात नवीन वर्षाची सुरूवात होते. म्हणूनच जानेवारी महिना उत्साहाचा, नववर्षागमनाचा आणि आनंदाचा असतो. वर्षभरात जो काही मनमुटाव, वाद आपल्यात झाले असतील, ज्या काही कटू घटना आपल्या आयुष्यात घडल्या असतील त्या मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया! असा गोड संदेश हा सण देतो.

आपला देश संस्कृतीप्रधान आणि सणावारांचा देश आहे. वर्षाचा प्रत्येक महिना, किंवा प्रत्येक दिवशी काही ना काही सणवार असतात. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांत हा सण येतो. संक्रांत म्हणजे संक्रमण करणारा म्हणजे वाढ करीत जाणारा वर्धिष्णु सण! या दिवसापासून दिवस वाढत जातो. रात्र कमी होते. वातावरणातील थंडावा कमी होवून उष्मा वाढत जातो. सूर्याचा मकर राशीत होणार्‍या आगमनाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांत होय!
अनेकांच्या मनात दरवर्षी हा प्रश्न पडतो की दरवर्षी संक्रांत त्याच तारखेला का येते? याचे कारण सूर्य सौरगणनेनुसार म्हणजे सूर्यकॅलेन्डरनुसार 14, फारच झाले तर 15 जानेवारी याच दिवशी संक्रांत हा सण येतो. आशिया खंडात हा संक्रांतीचा सण बहुतांश देशात साजरा केला जातो. नेपाळमध्ये तो माधी या नावाने, थायलंडमध्ये सोंक्रांत तर म्यानमारमध्ये थिंगयान या नावाने हा सण साजरा करतात.

भारतात विविध प्रांतात विविध नावाने वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये पोंगल, लोहरी अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. त्यादिवशीचे आकाश लाल, पिवळ्या, निळ्या विविध रंगांनी सजलेले असते. संक्रांतीचा हा उत्साह कितीतरी दिवस मनात रेंगाळत राहतो. अशा उत्साहात नवीन वर्षाची सुरूवात होते. म्हणूनच जानेवारी महिना उत्साहाचा, नववर्षाआगमनाचा आणि आनंदाचा असतो.

हाच आनंद द्विगुणित करणारा, वाढवणारा सण म्हणजे संक्रांत! या दिवसाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन कारणांमुळे महत्त्व आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे, या दिवसानंतर रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होवू लागतो. थंडीचा जोर पूर्णपणे नसला तरी थोड्या प्रमाणात कमी होवू लागतो. हवामान कोरडे असते. अशा वेळी तीळ आणि गुळ यांचा आहारात समावेश करणे हा आरोग्यसल्ला अतिशय गुणकारक ठरतो. तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाचा उष्णपणा याचे परिणाम तब्येतीसाठी उत्तम! तसेेही आपल्याकडे ऋतूमानानुसार सणांचे, देवांचे, प्रसाद असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या, गुळपोळ्या हा प्रमुख पदार्थ असतो. उत्सवप्रिय अशा आपल्या देशात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वातावरणातला उत्साह, सळसळता आनंद, हवेच्या झुळकीबरोबर अंगाला मनाला स्पर्श करीत असतो. या दिवसातले वारे संक्रांतीचे वारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या वार्‍यांवर अनेक मराठी कविता, भावगीते बेतलेली आहेत. हीच वार्‍याची अनुकुलता पतंग उडविण्यासाठी योग्य असते आणि म्हणूनच पतंगाचा खेळ या दिवसात खेळला जातो. नववर्षाची सुरुवात अशा आनंददायक सणाने होत असते. यातच 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या विशेषत्वाची भर पडते. भारतीयांना या दुग्धशर्करा योगाची खुशी होते.

संक्रांतीनिमित्त दिल्या जाणार्‍या तीळगुळाच्या विविध पदार्थांमागचा उद्देश देखील अतिशय चांगला आहे. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आपण एकमेकांना भेटतो यामागील उद्देश असा की, वर्षभरात जो काही मनमुटाव, वाद आपल्यात झाले असतील, ज्या काही कटू घटना आपल्या आयुष्यात घडल्या असतील त्या मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया! असा गोड संदेश हा सण देतो. भारतीय परंपरेवर, संस्कृतीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, आपल्या प्रत्येक सणांमधून एक चांगला संदेश नेहमीच असतो. प्रत्येक सणाला एक कथानक असते. त्या-त्या सणांची देवता असते. अशाच प्रकारच्या अनेक कथा रूपकं या सणाशी जोडलेले आहेत. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. यासोबत बाजरीची, ज्वारीची आणि मक्याची भाकरी, वालाच्या शेंगांची भाजी, मुगाची खिचडी, गुळाची पोळी असा नैवेद्य देवाला दाखवितात. या दिवशी प्रत्येक ठिकाणी तीळाचा वापर केला जातो. इतकं अनन्यसाधारण तिळाला महत्त्व आहे.

स्त्रियांना या सणाचे अपार कौतुक असते. नवविवाहितांचे तर अधिक कौतुक होते. पहिल्या संकांतसणाच्या आठवणी आजही एखाद्या प्रौढेच्या चेहर्‍यावर नवतारुण्याचे तेज आणतात. काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदीकुंकू अशा अनेक आठवणी या संक्रांतीशी जोडलेल्या असतात. लहान बाळांचे देखील असेच कौतुक होते. काळे झबले, हलव्याचे दागिने, लूट अशा प्रकाराने आनंद साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी संक्रांतीपूर्वी हलवा देखील घरी बनविला जात असे. सकाळ- दुपारची सगळी कामं आटोपून निवांत वेळात लोखंडी शेगडीत कोळसे पेटवून मंद आचेवर हलवा बनविला जात असे. पुरेसा हलवा तयार झाल्यावर हलव्याचे दागिने बनविले जात. त्यातून त्यांचे कौशल्य दिसून येत असे. नवीन नवरी, नवं बाळ यांना या दागिन्यांनी सजवत कौतुक करीत असत. आजही, मॉडर्न युगात या गोष्टी आवर्जून केल्या जातात. काळ्या साड्या ते आता ड्रेस मटेरियल असा प्रवास असला तरी त्याचे अस्तित्व आढळून येते. मनुष्य मुळातच आनंद देणारा आणि घेणारा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...