Friday, June 19, 2026
HomeनगरNewasa : नेवाशातील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा

Newasa : नेवाशातील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 729 व्या संजीवन समाधी सोहळया निमित्त माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सायंकाळी 729 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.या दीपोत्सवाने संत ज्ञानेश्वर मंदिर लखलखले होते. 729 पणत्या पेटवून ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करण्यात आले. अज्ञानाचा अंधकार संपून ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या ह्रदयात तेवावा अशी प्रार्थना करण्यात आली.

- Advertisement -

रामकृष्ण हरी च्या सुमधुर भजनाने सुरुवात करुन भजन सम्राट अदिनाथ सटले (आळंदी) यांनी भजनसंध्या सादर केली.
दीपोत्सवा प्रसंगी संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पहाटे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैसखांबाची विधिवत पूजन देविदास म्हस्के, शिवाजी होन, विठ्ठलराव सावंत यांच्या हस्ते करण्यात येऊन सायंकाळी 6 वाजता पहिला दिवा पैस खांबासह माऊली समोर देविदास म्हस्के, डॉ भाऊसाहेब घुले व शारदा भाऊसाहेब घुले, शिवाजी होन, रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, गोरख भराट यांच्या हस्ते लावण्यात आला.

सकाळपासून संजीवन समाधी सोहळ्यानिम्मित भाविकांनी पैस खांबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती . दीपोत्सवानिमित्ताने करजगाव येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाच्या महिला, पुरुष सेवेकर्‍यांनी मंदिर परिसर स्वच्छ करून दीपोत्सवासाठी सेवा दिली. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांनी भैरवी रागात समाधीचा अभंग गायला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिपोत्सवास उपस्थित भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासह फोटो काढले.

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...