Sunday, February 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजांची आत्महत्या; लग्नाच्या तोंडावर उचललं ...

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजांची आत्महत्या; लग्नाच्या तोंडावर उचललं टोकाचं पाऊल

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

पुणे | Pune

जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प. शिरीष मोरे महाराज (देहूकर) (Shirish More Maharaj) यांनी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. त्यामुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे (देहूकर) यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. येत्या २० फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता. शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते.

सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. यावेळी त्यांनी दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते. तसेच आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडण्यात आले. त्यावेळी मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी (letter) देखील लिहून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून आत्महत्या केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे (Dehurod Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. तर हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मंत्री नितेश राणेंकडून शोक व्यक्त

राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिरीष महाराज मोरे (देहूकर) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, “संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक हभप शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले. मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली”, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या