Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्या“उद्धव ठाकरेंनी येड्यांची जत्रा जमवली, मात्र या जत्रेचा…”; संतोष बांगरांचा पलटवार

“उद्धव ठाकरेंनी येड्यांची जत्रा जमवली, मात्र या जत्रेचा…”; संतोष बांगरांचा पलटवार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray)यांनी काल हिंगोली येथील सभेतून केलेल्या टीकेला शिवसेनेचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी येड्यांची गर्दी जमवली. त्यांची सभा म्हणजे येड्याची जत्रा होती. मात्र या येड्यांच्या जत्रेचा आमच्या शिवसेनेवर कुठलाही परिणाम पडणार नाही, असे प्रत्युत्तर संतोष बांगर यांनी दिले.

तसेच शिंदे गटाने माझा बाप चोरला. ही बाप चोरणारी टोळी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचाही बांगर यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आमचा बाप चोरला असे कुणीही म्हणू शकत नाही, असेही प्रत्युत्तर बांगर यांनी दिले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

संतोष बांगर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी जे चांडाळ चौकडी लोक जमा केले आहेत. ते एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जातंय. पण त्यांच्या एका जिल्हाप्रमुखाने चार पक्ष बदललेत. तर दुसरा एक जिल्हाप्रमुख आधी राष्ट्रवादीचा होता. नंतर मनसे आणि आता शिवसेनेत आला आहे. हे लोक बजबजलेल्या नालीत बुडलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी येड्यांची जत्रा उभी केली. हे येडे काय करू शकतात, हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या अंगावर जरा धावून गेलं, तर हे भुर्र पळून जाणारी लोक आहेत. त्यामुळे याचा आमच्या शिवसेनेवर काही फरक पडणार नाही.

बाप चोरल्याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानावर भाष्य करताना संतोष बांगर म्हणाले, मला आतातरी असं वाटतंय की, उद्धव ठाकरे यांनी माझा बाप चोरला आहे, असं बोलणं बंद करावं. हे बस्स झालं आता. उद्या कुणीतरी म्हणेल माझा देव चोरला. मग देव कुणा एकाचा असतो का? तसेच बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यामुळे ते माझा बाप आहेत, असं कुणीही म्हणू नये. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप होते. ते एका कुणाचे बाप असू शकत नाहीत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे म्हणाले की,श्रावण महिना सुरू झाला आहे. नागपंचमी झाली. गद्दारांना साप समजून पूजायला लागलो. पायाखाली साप आला तर शेतकऱ्यांना काय करायचे हे माहीत आहे. अवैध धंदे करणारा हिंदू असेल का, असू शकतो? गोलीचे गद्दार उद्धटपणा करतात, त्यांना गाडून टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे हिंगोलीच्या सभेतून जनतेला केले आहे.

उद्धव म्हणाले की, आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे.नुकतीचनागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. पुंगी वाजवली, दूध पाजलं,सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या