नाशिक | Nashik
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे. पोलीसांनी कृष्णा आंधळेला फरार घोषीत केले आहे. मात्र, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच कृष्णा आंधळेबाबत मोठी माहिती समोर येत आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा सुगावा लागल्याची माहिती समोर आली असून तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
फरार कृष्णा आंधळेला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून तपास सुरु आहे. एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येसाठी कारणीभूत असलेला कृष्णा आंधळे हा गुन्हेगार असून गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार आहे, पोलिसांची अनेक पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच पुन्हा एकदा कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसून आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा