मुंबई । Mumbai
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. संतोष देशमुख यांना आपलं बरंवाईट होईल यांची पूर्वकल्पना होती, असा अंदाज मुलगी वैभवी देशमुख हिच्या जबाबातून लावण्यात येत आहे. आपल्या मृत्यूच्या एकदिवस आधी संतोष देशमुख यांनी वैभवीकडे काळजी व्यक्त केली होती.
या जबाबामध्ये वैभवी म्हणाली की, “माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे. तसेच विष्णु चाटे आणि संतोष देशमुख यांचंदेखील बोलणं झालं. त्यावेळी भाऊ एवढ काय झालं? इतकं कशाला ताणता? लहान गोष्टीवरून जिवावर कशाला उठता? असे वडील चाटेशी बोलत होते. त्यांचा जवळपास 10 ते 12 मिनिटं सुरु होता. असं वडिलांनी मला सांगितलं”.
संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना मारहाण करून हकललं त्यानंतर विष्णू चाटे याने देशमुखांना फोन केला होता. या फोननंतर देशमुख तणावामध्ये असल्याचं त्यांच्या पत्नीनेही म्हटलं होतं. ६ डिसेंबरला ही घटना झाल्यावर आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ९ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण करत त्यांनी संपवलं.
माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला आहे. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे.