Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमKrishna Andhale Wanted : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे बीड...

Krishna Andhale Wanted : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे बीड पोलिसांकडून फरार घोषित

बीड । Beed

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कृष्णा आंधळे अद्याप फरार असून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत . कृष्णा आंधळे फरार घोषित करून माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .

- Advertisement -

फरार घोषित कधी करतात?

जेव्हा कोर्टाकडून एखाद्या व्यक्तीला अजामीनपात्र वॉरंट जारी केलं जातं, त्यानंतरही अनेकदा नोटीस बजावूनही ती व्यक्ती कोर्ट किंवा पोलिसांसमोर शरणागती पत्करत नाही, तेव्हा सीआरपीसीच्या कलम 82 अन्वये त्याला फरार घोषित केलं जातं. सामान्य भाषेत त्याला तडीपारही म्हटलं जातं. पण कायद्याच्या भाषेत त्याला फरार म्हटलं जातं. फरार घोषित केल्यानंतर आरोपीला 30 दिवसाच्या आत कोर्टात अपील करावी लागते. जर त्याने अपील करायला उशीर केला तर त्याला उशीर का झाला याचं कारणही द्यावं लागतं.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात हे प्रकरण तापलं, मात्र तरीही पोलिसांना अनेक दिवस या आरोपींना पकडता आलं नव्हतं. 31 डिसेंबरला स्वत: वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण आला. तो शरण आल्यानंतर इतर आरोपीपी अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडले. मात्र, याच आरोपींच्या सोबत हा कृष्णा आंधळे होता अशी माहिती आहे. तरीही तो पोलिसांना सापडलेला नाही. विशेष म्हणजे तो आधीच एका प्रकरणात फरार होता अशीही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी आता हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...