Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSantosh Deshmukh Case : हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि चाटे यांचे फोनवरून...

Santosh Deshmukh Case : हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि चाटे यांचे फोनवरून संभाषण; एसआयटीची कोर्टात माहिती

संतोष देशमुखांना धमकीही दिली

बीड | Beed

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर मकोका दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात कराडचा ताबा एसआयटीने घेतला असून आज त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर (Anil Gujar) यांनी वाल्मिक कराडच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तसेच गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम मांडला.

- Advertisement -

यावेळी तपास अधिकारी गुजर म्हणाले की, “हत्येच्या (Murder) दिवशी वाल्मिक कराडने सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती. ९ डिसेंबरला केज तालुक्यात संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्याआधी ३ ते ३.१५ दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यादिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते”, अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.

गुजर पुढे म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या अपहरणाची (Kidnapping) वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती आहे .सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये ९ डिसेंबरला फोनवरून काय बोलणे झाले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला १० दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली. तर वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी न्यायालयात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच मकोका कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. याशिवाय इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. त्यामुळे आता यावर न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केली लुटमार; दोन संशयित जेरबंद

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati लिफ्ट देण्याचा बहाना करून जबरी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयितांकडून एक...