अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
सोन्याचे दागिने (Gold Jewelry) खरेदी करायचा बहाणा करून बुरखाधारी महिलेने सराफ बाजारातील शिवनारायण दलीचंद वर्मा यांच्या दुकानातून सुमारे दोन तोळ्याचे गंठण चोरून (Theft) नेले. सोमवारी (दि. 9) दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी बुधवारी (दि. 11) कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात महिलेविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. योगेश शिवनारायण वर्मा (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.
‘अर्बन’च्या पुनर्जीवनासाठी सहकार्य करू
सोमवारी दुपारी फिर्यादी त्यांच्या सोन्याच्या दुकानात होते. दुपारी 2:40 च्या दरम्यान एक बुरखाधारी महिला त्यांच्या दुकानात आली. ती फिर्यादीला म्हणाली, मला सोन्याचे दागिने (Gold Jewelry) खरेदी करायचे आहे, तुम्ही मला नवीन डिझाईनचे गंठण दाखवा. फिर्यादीने तिला दोन ट्रे मधील सोन्याचे गंठण दाखविले. तीने एक सोन्याचे गंठण पसंद केले व मॅचिंग कानातले दाखवा असे म्हणाली.
हेरंब कुलकर्णींना मारणार्यांचे बोलवते धनी शोधा
फिर्यादी तिला कानातले दागिने (Jewelry) दाखवित असताना ती महिला फिर्यादीला म्हणाली, मी भावाला व पैसे घेऊन परत तुमच्या दुकानात येते, असे सांगून दुकानातून निघून गेली. काही वेळाने फिर्यादीने गंठण असलेला ट्रे तपासला असता त्यामध्ये सुमारे दोन तोळ्याचे गंठण त्यांना दिसून आले नाही. त्या महिलेले गंठण चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रोडरोमिओंवर एलसीबीकडून कारवाई; कॉलेज परिसरात वावरणार्यांना पकडले
रेल्वेतून पळण्यापूर्वीच कोतवाली पोलीस पोहचले