Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमCrime News : सराफ दुकानातून दोन लाखांचे सोन्याचे मिनी गंठण लंपास

Crime News : सराफ दुकानातून दोन लाखांचे सोन्याचे मिनी गंठण लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी परिसरातील नामांकित सराफ दुकानातून ग्राहक बनून आलेल्या चौघांनी सुमारे दोन लाख रूपये किमतीचे सुमारे 16 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (18 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास बाहुबली भोसेकर (वय 33, रा. निर्मलनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ते चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या सावेडी शाखेत असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisement -

12 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शोरूममध्ये तीन महिला व एक पुरूष ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी सोन्याचे पट्टी प्रकारातील शॉर्ट गंठण पाहण्याची मागणी केली. त्यानुसार सेल्सपर्सन राजश्री गावडे यांनी त्यांना विविध डिझाइनचे गंठण दाखवले. ग्राहकांना सुरूवातीला दाखवलेले दागिने पसंत न पडल्याने कपाटातील दुसर्‍या डब्यातील मिनी गंठण पुन्हा दाखवण्यात आले.

मात्र खरेदी न करता ते चौघे शोरूममधून निघून गेले. त्यानंतर काउंटरवरील दागिने परत ठेवताना एक सोन्याचे मिनी गंठण गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर कर्मचार्‍यांनी बाहेर शोध घेतला, मात्र संबंधित ग्राहक आढळून आले नाहीत. संशय आल्याने शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एका महिलेने समोरील महिलेच्या आडोशाने काउंटरवरील सोन्याचे मिनी गंठण चोरून साडीमध्ये लपवल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणी अनोळखी तीन महिला व एका पुरूषाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...