Tuesday, May 6, 2025
Homeनाशिक‘सरस्वती मुर्ती स्फूर्ती देण्याचे काम करेल’: नीलीमा पवार

‘सरस्वती मुर्ती स्फूर्ती देण्याचे काम करेल’: नीलीमा पवार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

‘दिंडोरीचे (dindori) सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत राजे यांनी दिंडोरीत मविप्र (mvp) महाविद्यालयाच्या प्रांगणात सरस्वतीदेवीची मुर्ती (Saraswati devi) भेट देऊन चिरकाळ टिकणारे काम केले आहे. महाविद्यालयात (college) येणार्‍या विद्यार्थ्यांना (students) सरस्वती मुर्ती ज्ञानदानाचे काम करेल’ असे प्रतिपादन मविप्रच्या सरचिटणीस नीलीमा पवार (MVP General Secretary Neelima Pawar) यांनी केले.

- Advertisement -

दिंडोरी मविप्र महाविद्यालयाच्या प्रांगणात सुर्यकांत राजे यांनी सरस्वतीची मुर्ती भेट दिली. तिचा अनावरण सोहळा (unveiling ceremony) सरचिटणीस नीलीमा पवार (nilima pawar) व संचालक दत्तात्रय पाटील (Director Dattatraya Patil) यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नीलीमा पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संचालक दत्तात्रय पाटील होते. यावेळी नीलीमा पवार यांनी शिक्षकांना गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शन केले. दिंडोरी नगरपंचायतीने जागा दिल्यास मविप्र संस्था फॉर्मसी कॉलेज (college of Pharmacy) सुरु करेल असेही आश्वासन दिले.

यावेळी दत्तात्रय पाटील यांनी दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) मविप्र संस्थेने केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी बॉटनिकल गार्डनचे (Botanical Garden) उद्घाटन माधव पाचोरकर यांच्या हस्ते करण्यात आले तर सोलर मशिनचे (solar machine) उद्घाटन (inauguration) बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, शाखा अभियंता अनिल टिकस, नितीन गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थी संघाने बँचेस भेट दिले.

दर्पणनियत कालीक व डॉ. वेदश्री थिगळे यांनी लिहीलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन सोहळा (book release ceremony) संपन्न झाला. यावेळी भास्कर भगरे, सुर्यकांत राजे, रवी जाधव, नरेश देशमुख, काका देशमुख, कैलास देशमुख, शाम हिरे, संदीप गायकवाड, नयन बुरड, सतिश वाळके, उमेश पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बलराम कांबळे यांनी केले तर आभार प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर जिल्ह्यात पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी येथे आज (दि. 6) होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री...