अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
फेब्रुवारी, 2025 व त्या पुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता, ग्रामपंचायत कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे 19 महिन्यांतील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रु.140,42,84,000/- (रुपये एकशे चाळीस कोटी बेचाळीस लाख चौर्याऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सरपंचांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचार्यांचे थकीत फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वित्त विभागाने मूळ अर्थसंकल्पीय तरतूदीतील शिल्लक अधिक तपास सुरू तसेच हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीमधील अवितरीत निधीतून फेब्रवारी व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे 19 महिन्यांतील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रु.140,42,84,000/- (रुपये एकशे चाळीस कोटी बेचाळीस लाख चौर्यांशी हजार फक्त) इतका निधी वितरीत केला आहे. सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष, पंचायत राज, पुणे यांना अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरीत करण्यात येणार आहे.