अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत नगर जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींपैकी 624 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात 312 ठिकाणी महिलांचा समावेश असणार आहे. यासह 330 ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून यात 165 महिलांना संधी मिळणार आहे. तर 119 ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून यात 60 ठिकाणी महिला, तसेच दीडशे ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून यात 75 महिला सरपंच यांचा समावेश राहणार आहे.
अहिल्यानगरसह राज्यातील 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत सरपंच पदाचे आरक्षण सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन राजपत्र यामध्ये 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात राज्यात अनुसूचित जातीसाठी 3258 , अनुसूचित जमातीसाठी 1843, ओबीसीसाठी 6115 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 हजार 586 ठिकाणी सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिगर अनुसूचित क्षेत्रातील 1223 ग्रामपंचायतमध्ये 150 ठिकाणी अनुसूचित जातीसाठी सरपंच पद आरक्षित राहणार असून यात 75 महिलांचा समावेश राहणार आहे. 119 ठिकाणी सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित राहणार असून यात 60 महिलांचा समावेश राहणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी 330 ठिकाणी सरपंच पद आरक्षित राहणार असून यात 165 महिलांचा समावेश असणार आहे तर 624 ठिकाणी सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी राहणार असून यात 312 खुल्या प्रवर्गातील महिला सरपंचाचा समावेश राहणार आहे.