Tuesday, September 24, 2024
HomeनगरSarvmat Expo 2023 : सार्वमत एक्स्पोत ग्राहकांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarvmat Expo 2023 : सार्वमत एक्स्पोत ग्राहकांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

- Advertisement -

सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2023 महोत्सवात (Sarvmat Shopping Expo 2023) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या व्यावसायिकांनी थाटलेल्या स्टॉलवर ग्राहकांनी गर्दी केली होती. यानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समुह नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. काल दैनिक सार्वमत एक्स्पोस्थळी दुसर्‍या दिवशीच जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

दै. सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2023 महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून समता नागरी सहकारी पतसंस्था (Samata Patsanstha) असून सहप्रायोजक म्हणून टाटा मॅक्स मोटर्स (Tata Max Moters) आणि रॉयल इनफिल्ड ए युनिट ऑफ कराचीवाला अहमदनगर (Royal Enfield Ahmednagar Nashik), नाशिक तसेच साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी (Sai Adarsh ​​Multistate Co Op. Credit Society), अशोक शैक्षणिक संकुल अशोकनगर (Ashok Educational Sankul Ashoknagar) हे आहेत.

कालपासून सुरु झालेला हा महोत्सव दि. 5 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. काल दुसर्‍या दिवशी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. खाद्यपदार्थांचे स्टालही खवय्यांच्या गर्दीने फुलून गेले होते.

या शॅपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, विविध औषधे, तसेच टु व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंतचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी सुरु आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिकबाबतची माहिती मिळावी म्हणून काही शैक्षणिक संस्थांनी ती सुविधाही या ठिकाणी प्राप्त करुन दिली. ग्राहकांना खरेदी बरोबरच विविध खाद्य पदार्थांचा आस्वादही या ठिकाणी घेता येणार आहे.

सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा मान्यवरांची उपस्थिती व ग्राहकांच्या गर्दीने शानदार शुभारंभ

सोबतीला विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही या ठिकाणी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होत आहेत. यामध्ये आज शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता झी टीव्ही कलाकार दीपक वाघ यांचा सरगम हिंदी, मराठी चित्रपट गितांचा सदाबहार कार्यक्रम तर दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता रियाज पठाण प्रस्तुत महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

काल झालेल्या समुह नृत्य ग्रुप स्पर्धेत भि. रा. खटोड कन्या विद्यालय, श्रीरामपूर, क. जे. सोमैय्या हायस्कूल, श्रीरामपूर, शां. ज. पाटणी विद्यालय, श्रीरामपूर, अनिल दिगंबर मुळे विद्यालय, श्रीरामपूर, डी. डी. काचोळे विद्यालय, श्रीरामपूर न. पा. शाळा क्र. 5 श्रीरामपूर, डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूल, टिळकनगर, दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा, श्रीरामपूर, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर वडाळा महादेव, शं. स. डावखर कन्या विद्यालय, श्रीरामपूर, केब्रीज हाय इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज श्रीरामपूर, साई इंग्लिश मीडियम स्कूल, बेलापूर, प्रेमजी रतनजी पटेल हायस्कूल, श्रीरामपूर व मॉडेल इंग्लिश स्कूल, श्रीरामपूर या मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. ंया सांस्कृतिक उपक्रमात सहभागी सर्व संघांना सार्वमतच्या वतीने रोख रक्कम, ट्रॉफी व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.

दैनिक सार्वमतने आयोजित केलेला हा एक्स्पो पहाण्यासाठी नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरीक येत आहेत. अनेकांना हा एक्स्पो खूपच आवडल्याने दरवर्षी असा एक्स्पो आयोजित करत चला, अशा प्रतिक्रिया देण्यास ग्राहक विसरले नाहीत.

दै. सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2023 या खरेदी महोत्सवात उद्या रविवार दि. दि. 5 फेब्रुवारी रोजी सायं. 6 वा. रियाज पठाण प्रस्तृत महिलांसाठी ‘खास खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. इच्छुक महिलांनी आपली नावे दैनिक सार्वमत कार्यालय अथवा थत्ते मैदान एक्स्पो स्थळी नोंदवावीत. या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दै. सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2023 मध्ये सहभागी होणार्‍या ग्राहकांसाठी कुपन देण्यात येत आहेत. त्यातून दररोज तीन ‘भाग्यवान’ ग्राहक सोडत काढली जात असून त्यांना आकर्षक बक्षिसे दिली जात आहेत. काल शुक्रवारचे भाग्यवान ग्राहक ठरले अनिरुध्द अनिल वतारे (श्रीरामपूर), प्रगती अरविंद थोरात (संभाजीनगर, श्रीरामपूर) व जयदत्त थोरात (श्रीरामपूर). विजेत्यांनी आपले बक्षीस ओळखपत्र दाखवून घेवून जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता कलाकार दिपक वाघ यांचा सरगम हिंदी, मराठी चित्रपट गितांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या