Tuesday, May 5, 2026
Homeनगरदैनिक सार्वमत शॉपिंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

दैनिक सार्वमत शॉपिंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पो-2026 म्हणजे नवउद्योजक उभा करण्याचे एक व्यासपीठच : वाघचौरे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 चा शानदार शुभारंभ काल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापूण, दीपप्रज्वलन व हवेत फुगे सोडून करण्यात आला. शॉपिंग एक्स्पो च्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.
दैनिक सार्वमतच्या वतीने सहाव्या वर्षी श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर भव्य शॉपिंग एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून या शॉपिंग महोत्सवाचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल, श्रीरामपूर तर सह प्रायोजक साई आदर्श मल्टीस्टट, राहुरी फॅक्टरी हे आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले, अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, श्री इंम्पेक्सचे संचालक अविनाश कुदळे, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, सराफ व्यावसायिक सोमनाथ महाले, कृष्णा कलेक्शनचे संचालक कृष्णा पुरुषोत्तम झंवर, नटराज बुक डेपोचे संदीप शहा, गदिया फर्मच्या श्रीमती पुष्पलता गदिया, दैनिक सार्वमतचे व्यवस्थापक महेश गिते, वृत्तसंपादक अशोक गाडेकर, वृत्तसंपादक बद्रीनारायण वढणे, जाहिरात व्यवस्थापक अश्विन मुथा, जाहिरात सह व्यवस्थापक विशाल वर्धावे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे दैनिक सार्वमतच्या वतीने स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले, दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पो-2026 म्हणजे नवउद्योजक उभा करण्याचे एक व्यासपीठच आहे, ज्याप्रकारे सार्वमतची लेखणी चालते, त्याच पध्दतीने दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पोच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवउद्योजकांचे कलाकौशल्य, त्यांनी बनविलेल्या विविध वस्तू जनतेपर्यंत पोहच करण्यासाठीही सार्वमतचे मोठे योगदान आहे. यामुळे अनेक नवउद्योजकांना आपले उद्योग उभारणीसाठी चालना मिळेल, असे सांगुन त्यांनी सार्वमतच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या, तसेच या शॉपिंग एक्स्पोचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्वमतचे संपादक अनंत पाटील यांनी केले, सूत्रसंचालन तालुका प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले. तर शेवटी जाहीरात व्यवस्थापक अश्विन मुथा यांनी आभार मानले. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर काल शुभारंभ झालेला हा खरेदी महोत्सव दि.16 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. यामध्ये ग्राहकांना विविध वस्तू खरेदीच्या आनंद लूटता येणार असून, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही लाभ सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत घेता येणार आहे.
या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध आहेत.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक कारखान्याचे माजी संचालक जालिंदर कुर्‍हे, निलेश बोरावके, पंडीतराव बोंबले, वैभव सुरडकर, अनिल छाबडा, उदय भंडारी, सुरेंद्र गिरमे, दिपक कदम, दैनिक सार्वमतचे नेवासा तालुका प्रतिनिधी सुखदेव फुलारी, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचीव प्रकाश कुलथे, खजिनदार अनिल पांडे, सहसचीव महेश माळवे, सदस्य नवनाथ कुताळ, अमोल कदम, प्रा. सुखदेव शेळके, प्रा. बाळासाहेब चव्हाण, रावसाहेब साठे, कडूभाऊ पुजारी, तिलक डुंगरवाल, राजू पाटणी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज सोलो तर उद्या ग्रुप डान्स
एक्स्पो मध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आज शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलो डान्स, शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्स व रविवार दि. 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

भाग्यवान ग्राहक सोडत
शॉपिंग एक्स्पोला भेटी दिलेल्या ग्राहकांनी दररोज कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून 3 भाग्यवान ग्राहकांची लकी ड्रा पध्दतीने सोडत काढली जाणार असून दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. तरी ग्राहकांनी या शॉपींग महोत्सवास भेट देवून मनमुराद् खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम...