Saturday, April 4, 2026
HomeनगरSarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोमध्ये श्रीरामपुरकरांची अलोट गर्दी

Sarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोमध्ये श्रीरामपुरकरांची अलोट गर्दी

स्थानिक कलाकारांच्या ग्रुप डान्सने जिंकली प्रेक्षकांची मने

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दि. 12 फेब्रुवारी पासून येथील थत्ते मैदानात सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 ला काल शनिवारी तिसर्‍या दिवशी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अलोट गर्दी केली. अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली. यानिमित आयोजित स्थानिक कालाकारांच्या ग्रुप डान्सनेही प्रेक्षकांची मने जिंकली.
दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पोच्या काल तिसर्‍या दिवशी ग्राहकांनी या खरेदी महोत्सवाला अलोट गर्दी केली होती. या महोत्सवासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल, श्रीरामपूर असून सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी हे आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील व शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून काल सायंकाळी ग्रुप डान्सचे आयोजन करण्यात आले होते. वरद दहाते याच्या गणपती स्तवनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. त्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. यामध्ये चिमुकल्यांनी बडबड गिते, पीएमश्री नगरपालिका शाळा क्र. 7 श्रीरमपूरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिवतांडव नृत्य, कोळी गीत, देशभक्तीपर गीत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीते खास आकर्षण ठरले.

ग्रुप डान्समध्ये शहरातील स्टार किडसच्या शिवांश कुंदन रासकर, सिध्दी विशाल दुधाळ (एक लडकी थी दिवानीशी), पार्थ उपाध्ये, आर्या उपाध्ये, पीएमश्री नगरपालिका शाळा क्र. 7 श्रीरमपूर (शिवतांडव), ए.के.डान्स स्टुडिओ किडस ग्रुप (बॉलीवूड साँग), श्रीरामपूर येथील महाराष्ट्र सेवा मंडळाचे प्राथमिक विद्यालय (कोळी गीत), अनिल दिगंबर मुळे प्राथमिक शाळा, संजयनगर (देशभक्तीपर गीत), आरोही वांढेकर, दिव्यांका सातपुते (तु जरा माझ्याशी बोलना), वेदांत दरेकर व सहकारी (बजने दे घडक धडक), स्वरा गायकवाड व सहकारी (फ्युजन साँग), श्लोक गायकवाड व निरा बनकर (मिक्स साँग), सुनिल आहेर (बडबड गीत), प्रथमेश निलेश करवा (मिक्स साँग), शिवांशी सूर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. उपस्थित प्रेक्षकांनी त्यास मनमुराद दाद दिली.

श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर सुरु असलेला हा खरेदी महोत्सव दि.16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. यामध्ये ग्राहकांना विविध वस्तू खरेदीच्या आनंद, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही लाभ सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत घेता येत आहे. या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तु, विविध उपकरणे, सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध आहे.

काल शॉपिंग एक्स्पोच्या तिसर्‍या दिवशी शहर व तालुक्यातील ग्राहकांची अलोट गर्दी पहायला मिळाली, यावेळी विशेषत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, महिलांनी आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. शेवटचे दोन दिवस हा महोत्सव सुरु असून ग्रामीण भागातील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शॉपिंग एक्स्पोमध्ये बन्सल क्लासेस, चंदुकाका सराफ, वसिम टुल किट, काळे बंधू मसाले, शंकर मन्चुरियन मसाला, गोलेचा हेल्थ केअर, गिता कलेक्शन, आनंद किचनवेअर, एसबीआय लाईफ, आदित्य रिन्युएबल एनर्जी, इशिता कलेक्शन, आंबिका लॉन्ड्री, नागली फिंगर, पर्स ज्वेलरी, द्वारका चुरण, पैठणी साडी अ‍ॅण्ड जॅकेट, ज्योती हर्बल, कश्मिरी कुर्ता, गुजराथी नमकिन, साई ट्रेडर्स, श्री इम्पेक्स दि फर्निचर मॉल, टीव्हीएस कव्हर, आदिवासी तेल, व्दारका फुड, गणेश एबीसीडी, मिल्कोजी, राईस पापड, ससाणे सुपर शॉपी, सारीज्, कारपेट अली, अर्बन खादी-व्हाईट कुर्ती, मंगलमूर्ती अगरबत्ती, मुग वाती, रोटी मेकर, चिंतामणी सोलर, रानाजी आवळा, गौरी बिसवास, खादी कुर्ता, चॉकलेट-कुंदा पेढा, मामु ज्वेलरी, आचार सुरेश, स्टेशनरी, मोबाईल कव्हर, जुटे बॅग्स्, ड्रेस मटेरियल, गुग्लेस बेल्ट, खादी शर्ट, श्री दत्त लेडीज टेलर, जडी बुटी, गोल्डन पाम वॉटर पार्क, सलेगा, लवेश इंटरप्रायजेस, पायल कलेक्शन, व्हीआरबी सोलर, अन्नपूर्णा गृहउद्योग, नितुज क्रिएशन, लस्टर मॅजीक, जवस मांडेकाका, बालाजी पैठणी अ‍ॅण्ड सिल्क सारीज, सिध्दी पॅथॉलॉजी, बर्तन टेबल, बलोन्स ओपन स्पेस, मनोज जाड, शेगाव कचोरी मौलाना, मासवडी थाळी, फु्रट डिश, मुंबई चायनीज, कुल्फी मुंबई, शुगर कॅन्डी आदी स्टॉलधारक सहभागी झाले आहेत.

भाग्यवान ग्राहक सोडत
शॉपिंग एक्स्पोला भेटी दिलेल्या ग्राहकांनी दररोज कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून 3 भाग्यवान ग्राहकांची लकी ड्रा पध्दतीने सोडत काढली जात असून दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जात आहे. तरी ग्राहकांनी या शॉपींग महोत्सवास भेट देवून मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कालचे भाग्यवान ग्राहक
1) सौ. मनिषा मच्छिंद्र पिलगर, चौधरी मळा त्र्यंबकनगर, वॉर्ड नं. 7
2) नजमा शेख, श्रीरामपूर
3) सुकन्या अमोल शेलार, वॉर्ड नं. 7, उत्सव लॉन्सजवळ
( विजेत्यांनी आपले बक्षीस ओळखपत्र दाखवून एक्स्पो स्थळी अथवा दैनिक सार्वमत कार्यालयातून घेऊन जावे)

आज खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन
सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पो मध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आज रविवार दि. 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे...

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात कार क्रमांक MH15-JS-1053 विहिरीत कोसळली. या अपघातात कार मधील ९...