Monday, April 6, 2026
HomeनगरSarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोची ग्राहकांच्या महाविक्रमी गर्दीने सांगता

Sarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोची ग्राहकांच्या महाविक्रमी गर्दीने सांगता

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दि. 12 फेब्रुवारीपासून येथील थत्ते मैदानावर सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 ची काल ग्राहकांच्या उदंड प्रतिसादाने सांगता झाली. दरम्यान यानिमित्त आयोजित नामवंत कलाकार अबोली गिर्‍हे, चेतन लोखंडे, वाजीद खान प्रस्तूत ‘जल्लोष’ या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या मराठी-हिंदी गीतांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. तसेच विविध गृहोपयोगी वस्तू खरेदीबरोबरच चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याचा आनंद घेतला.
या महोत्सवासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल, श्रीरामपूर असून सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी यांचे सहकार्य लाभले.

- Advertisement -

दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो च्या सांगतेप्रसंगी सार्वमत-देशदूत ग्रुपचे संचालक तथा सीएओ सुनिल ठाकूर, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, मुख्य जाहीरात व्यवस्थापक अमोल घावरे, कार्पोरेट जाहीरात मॅनेजर संदीप राऊत, दैनिक सार्वमतचे व्यवस्थापक महेश गिते आदी उपस्थित होते. एक्स्पोला प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेशराव वाबळे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, नगरसेवक डॉ. दिलीप शिरसाठ, अर्चनाताई पानसरे, रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, भैरवनाथ नगरच्या सरपंच सौ. दिपाली फरगडे, श्री. प्रवीण फरगडे, शिरसगावच्या सरपंच सौ. राणी वाघमारे, संदीप वाघमारे, डॉ. वर्षााताई शिरसाठ, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन आदींसह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी देऊन खरेदीचा आनंद घेतला.

नामवंत कलाकार अबोली गिर्‍हे, चेतन लोखंडे, वाजीद खान प्रस्तूत ‘जल्लोष’ या ऑर्केस्ट्राचे प्रायोजक सुरेशकुमार कुंदनमल गदिया फर्मच्या श्रीमती पुष्पलताताई गदिया व अर्चना नितीन गदिया यांचा सन्मान सार्वमत-देशदूत ग्रुपचे सीएओ संचालक सुनील ठाकूर व संपादक अनंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर एक्स्पोचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉलचे संचालक अविनाश कुदळे यांचा सन्मान सार्वमतचे जाहीरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शेवटच्या दिवसाचे भाग्यवान ग्राहक
1) अनुराधा गणेश अस्वले (पूर्णवादनगर रोड,श्रीरामपूर)
2) शिवम गिरमे (गिरमे वस्ती)
3) सौरभ गोविंद सोमाणी (वार्ड नं. 7 श्रीरामपूर)
(वरील विजेत्यांनी आपले बक्षीस ओळखपत्र दाखवून दैनिक सार्वमत कार्यालयातून घेऊन जावे.)

ताज्या बातम्या

Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा लढण्याचा निर्णय योग्य, राजकारणातील...

0
नवी दिल्ली | New Delhi राज्यातील बारामती आणि राहुरी (Baramati and Rahuri) या विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बारामतीमधून महायुतीकडून...