Sunday, July 26, 2026
HomeनगरShrirampur : सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा आज भव्य शुभारंभ

Shrirampur : सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा आज भव्य शुभारंभ

श्रीरामपूरचे थत्ते मैदान ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज || अनेक मान्यवरांची उपस्थिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सलग सहाव्या वर्षीही आयोजित केलेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 महोत्सवाचा भव्य शुभारंभ आज दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता येथील थत्ते मैदानावर नगराध्यक्ष करण ससाणे, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, श्री इंम्पेक्सचे संचालक अविनाश कुदळे, साई आदर्श पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.

- Advertisement -

दैनिक सार्वमत गेल्या 6 वर्षापासून दरवर्षी शॉपिंग एक्स्पोचे आयोजन करत असून याहीवर्षी दि. 12 फेबु्रवारी ते दि. 16 फेब्रुवारी या कालावधीत सार्वमत शॉपिंग एक्स्पोचे आयोजन केलेले आहे. या शॉपिंग एक्स्पोचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल असून सहप्रायोजक म्हणून साई आदर्श पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या शुभारंभ प्रसंगी किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, कृष्णा कलेक्शनचे कृष्णा पुरुषोत्तम झंवर, सोमनाथ रघुनाथ ज्वेलर्सचे सोमनाथ महाले, नटराज बुक स्टॉलचे संदीप शाह, सुरेशकुमार कुंदनमल गादियाचे नवीन गदिया व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या महोत्सवासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. हा शॉपिंग एक्स्पो सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. यामध्ये ग्राहकांना खरेदीची पर्वणी साधता येणार आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही लाभ सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत घेता येणार आहे.

या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तु, विविध उपकरणे, सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी डिझाईन तसेच महिलांसाठी विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध असणार आहे. शॉपिंग एक्स्पोमध्ये दररोज भेटी दिलेल्या ग्राहकांनी कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये ते कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून 3 भाग्यवान ग्राहकांचे कुपन सोडत काढली जाणार असून दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. तरी ग्राहकांनी या शॉपींग महोत्सवास भेट देवून मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खेळ पैठणीसह मनोरंजनाचा धमाका
मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये शुक्रवार दि. 13 फेबु्रवारी रोजी सायंकाळी सोलो डान्स, शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्स व रविवार दि. 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Commonwealth Games 2026 : भारताच्या मीराबाई चानूने घडविला इतिहास; सलग तिसऱ्यांदा...

0
ग्लासगो | वृत्तसंस्था कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या चौथ्या दिवशी भारताने दमदार सुरुवात करत पदकांची कमाई सुरू ठेवली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताची स्टार खेळाडू मीराबाई चानू हिने...