नाशिक | प्रतिनिधी Nashik
भारताच्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधूनश्री.यशवंतराव महाराज जेष्ठ नागरिक संघ, सटाणा(बागलाण) येथे अविनाश कुलकर्णी ह्यांचे अवयवदान जागरूकता ह्या विषयावर व्याख्यान झाले.
आपल्या व्याखानात त्यांनी अवयवदानाची गरज व त्यातील अडथळे स्पष्ट करून नेत्रदान ,त्वचादन ,देहदान व अवयवदान ह्याबद्दल विस्तृत माहिती दिली. ब्रेन डेड ,कोमा ह्यातील फरक व ग्रीन कॉरिडॉर विषयी माहिती देत ZTCC, SOTTO ROTTO आणि NOTTO चे कार्यपद्धती ची माहिती दिली. श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले त्यांना अविनाश कुलकर्णी यांनी योग्य उत्तरे देऊन श्रोत्यांचे समाधान केले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
या वेळी कमलकिशोर भांगडीया यांनी वक्त्यांची ओळख केली. अध्यक्ष सुरेशदादा बागड व सर्व पदाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे कार्यक्रम उत्कृष्ट संपन्न झाला.कार्यक्रमास महिला वर्गाचाअतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.