बीड | Beed
खोक्या उर्फ सतीश भोसले याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश भोसलेला न्यायालयात हजर करण्यात आल्यानतंर त्याची सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालायने सहा दिवसांची म्हणजे २० मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावली. सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी त्याच्या वकिलांनी दिली.
काही दिवसापूर्वी बीड येथील सतीश भोसले या आरोपीचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर भोसले हा आरोपी फरार झाला होते. दरम्यान, बीड पोलिसांनी त्याला प्रयागनराजमधून अटक केली आहे. तर आज त्याला उत्तर प्रदेशमधून बीड येथे आणण्यात आले आहे. यावेळी कोर्टाने आरोपी भोसले याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जातीच्या राजकारणाचा बळी
सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यावेळी म्हणाली की, सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासरवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचे राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे.
सरकारी वकीलांनी आरोपी फरार आहे, त्याने वापरलेले हत्यार जप्त करणे आहे म्हणून आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे आहे, असे मुद्दे मांडले होते. आता आरोपी खोक्याचे घर जाळले आहे मग हत्यारे कुठून ताब्यात घेणार आहेत? वनविभागे त्याचे घर उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्या हातात हत्यारच नाही मग काय जप्त करणार आहेत. हे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हा गुन्हा घडला त्यावेळी सतीश भोसले शिरुरमध्ये होता. त्यानेच ढाकणे परिवाराला रुग्णालयात दाखल केले, असेही वकीलांनी सांगितले.
खोक्याचे घर पेटवले
दरम्यान, सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेले घर वनविभागाने बुलडोझरच्या सहाय्याने पाडले. सतीश भोसलेचे घर हे वनविभागाच्या जागेवर अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एक कायदेशीर नोटीस देऊन वनविभागाने शुक्रवारी कारवाई करत सतीश भोसलेचे घर पाडले.
शुक्रवारी रात्री, होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तींनी सतीश भोसलेचे पाडलेले घर पेटवून टाकले. त्यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप केला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा