Saturday, April 26, 2025
Homeनाशिकसातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव एसीबीच्या जाळ्यात

सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी 

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यास ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.आज दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून जाधव यास ताब्यात घेतले.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, एका दाखल गुन्हातील पकडलेले वाहन सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हे वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे जाधव यांनी पोलीस चौकीचे बांधकाम करण्यासाठी  ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

यातील ५० हजार रुपयांची रक्कम आज (दि.०६) दुपारी देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास रक्कम घेताना रंगेहात अटक करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. लाचलुचपत विभागाकडून गुन्हा नोंदविण्याचे कार्य सुरु आहे.

दरम्यान, कोणत्याही कामासाठी शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचार्यांकडून लाचेची मागणी होत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री १०६४ क्रमांकावर फोन करावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक   विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून...

0
नवी दिल्ली | New Delhi जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा...