Saturday, November 23, 2024
HomeनगरSatyajeet Tambe : जयश्री थोरातांवरच्या शाब्दिक हल्ल्यानंतर सत्यजीत तांबेंचा संताप; म्हणाले, "विखेंनी...

Satyajeet Tambe : जयश्री थोरातांवरच्या शाब्दिक हल्ल्यानंतर सत्यजीत तांबेंचा संताप; म्हणाले, “विखेंनी राजकारणाची…”

संगमनेर । Sangamner

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विखे-थोरात गटातील संघर्षाचा अखेर भडका उडाला. शुक्रवारी सायंकाळी धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा होती.

- Advertisement -

डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यानंतर जयश्री थोरात यांचे आत्ये भाऊ सत्यजीत तांबे यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल करत वसंतराव देशमुख यांनाही सुनावले आहे.

सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “सुजय विखे यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली आहे. आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे.”

तसेच “ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची.” अशा शब्दात सत्यजीत तांबे यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच. अशा इशारा देखील तांबे यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी सायंकाळी धांदरफळ बु येथे भाजपची युवा संकल्प सभा होती. डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत असलेल्या या सभेत वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली. देशमुख यांनी युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. बाप या शब्दावरून राजकारण पेटलेले असतानाच देशमुखांनी महिला नेत्यावर टीका करताना पातळी सोडल्याचा दावा केला जात आहे. देशमुख बोलत असताना मंचावर उपस्थित काही जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांना हटकले, मात्र भान सुटल्याचे त्यांना बऱ्याच वेळांनतर लक्षात आल्याचे म्हटले जात आहे. याचे पडसाद तालुक्यात उमटले.

सोशल मीडियातून ही वार्ता वेगाने पसरली. त्यानंतर शेकडो महिला, कार्यकर्ते धांदरफळ येथील सभास्थळी धावून गेले. धांदरफळ येथे विखेंच्या सभेनंतर स्थानिक थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांनी, सभास्थळी ठिय्या देत देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. देशमुखांच्या अटकेची मागणी करण्यात आली. सभा आटोपून परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना संतापाचा फटका बसला. अकोले नाका परिसरातील पुलाखाली, खांडगाव दुध डेअरी समोर चिखली येथे १०:३० च्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यानंतर एका गाडीची जाळपोळही झाली.

संगमनेर पालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, असे वृत्त होते. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचीही वार्ता होती, मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा तालुका पोलीस स्थानकाकडे वळवला. याठिकाणी ठिय्या आंदोलन करून डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या