Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यासत्यजित तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ

सत्यजित तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या (Legislative Council) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याने सर्वत्र चर्चेत राहिली.

त्यानंतर या मतदारसंघातून तीन वेळेस आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांचे पुत्र सत्यजित तांबे हे २१ हजार मतांनी अपक्ष विजयी झाले. यानंतर आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून (Graduate and Teacher Constituencies) विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानभवनात पार पडला. यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (MLA Satyajeet Tambe) यांनी देखील आमदाराकीची शपथ घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

… तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको – उद्धव ठाकरे

यावेळी नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून आमदारकीची शपथ (Oath of MLA) घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, या शपथविधीच्या कार्यक्रमाला थोरात साहेब आणि माझे वडील यांना उपस्थित राहता आले नाही असे त्यांनी म्हटले.

Turkey Earthquake : फुटबॉलविश्वात शोककळा! विनाशकारी भूकंपात तुर्कीच्या गोलकीपरचा मृत्यू

तसेच पुढे काँग्रेसविषयी बोलतांना ते म्हणाले की, मी माझ्या भावना काँग्रेस (Congress) श्रेष्ठींना कळवल्या असून मी अपक्ष निवडून आलो असल्याने आता जनतेच्या कामाला सुरुवात करणार आहे, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. याशिवाय आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तसेच चव्हाण यांनी देखील त्यांची गळाभेट घेत अभिनंदन केले.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

- Advertisment -

ताज्या बातम्या