Wednesday, May 29, 2024
Homeनगरसावेडी बसस्थानकासाठी पाच कोटी

सावेडी बसस्थानकासाठी पाच कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील सावेडी बसस्थानकाच्या विकासासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

सावेडी बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवासी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात या ठिकाणी नागरिकांना गाडीतून उतरणे देखील अशक्य होत असून आवारात पाणी साचल्याने प्रवाशांना आणि वाहनांना ये-जा करण्यास समस्या उद्भवत होती. दरम्यान यापरिस्थिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आ. संग्राम जगताप यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पाठपुरावा करून या बसस्थानकासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मागणी केली होती.

दरम्यान सावेडी बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यास सुमारे पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. या रकमेतून सावेडी येथे भव्य असे बसस्थानक उभारण्यात येणार असून यामध्ये तळमजला, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, रेन वॉटर हारवेस्टिंग, काँक्रीटीकरण आदी गोष्टींचा समावेश असेल. लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे बसस्थानक निर्माण होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या