Monday, May 20, 2024
Homeनगरखल्लास करण्याची धमकी देत सराफ व्यावसायिकाला लुटले

खल्लास करण्याची धमकी देत सराफ व्यावसायिकाला लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सराफ दुकान बंद करून घराकडे निघालेल्या व्यावसायिकाला रस्त्यात आडवून,‘शांत बस नाही तर खल्लास करीन’, अशी धमकी देत साडे चार तोळ्याच्या दोन चेन बळजबरीने काढून घेतल्या. मंगळवारी (दि. 25) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावेडीतील वेदांतनगरमध्ये ही घटना घडली. प्रकाश विठ्ठलराव मुंडलिक (वय 65 रा. वेदांतनगर, दत्त मंदिर, मनमाड रस्ता, सावेडी) असे लुटलेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांनी बुधवारी (दि. 27) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडलिक यांचे सावेडीतील भिस्तबाग चौक येथे हिंगणगावकर सराफ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. ते दररोज सकाळी 10 वाजता दुकान उघडून साडे आठ वाजता बंद करत असतात. मंगळवारी सकाळी 10 वाजता ते दुकानावर आले व रात्री पावणे नऊ वाजता दुकान बंद करून घरी जात असताना वेदांतनगर येथे त्यांच्या दुचाकीला विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकी आडवी लावली.

त्यातील एक जण उतरून मुंडलिक यांच्या दुचाकीवर बसला व म्हणाला,‘शांत बस नाही तर खल्लास करीन’, दुसर्‍याने मुंडलिक यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची एक व दोन तोळ्याची एक अशा साडे चार तोळ्याच्या दोन सोन्याच्या चेन बळजबरीने हिसकावून घेत घटनास्थळावरून निघून गेले. मुंडलिक यांनी तोफखाना पोलिसांना माहिती देत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या