Friday, September 20, 2024
Homeनगरसावेडीचे तलाठी-मंडलाधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सावेडीचे तलाठी-मंडलाधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जमीन मालकाकडे केली होती लाचेची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सावेडीचे तलाठी सागर भापकर आणि मंडलाधिकारी शैलजा रामभाऊ देवकाते यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी नामंजूर केला आहे. तलाठी भापकर आणि मंडलाधिकारी देवकाते यांनी शासकीय कामाच्या मोबदल्यात जमीन मालकाकडे लाचेची मागणी केली होती. संबंधित जमीन मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

तक्रारदाराच्या फ्लॅटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच स्वीकारल्याचे त्यांनी पंचांसमोर मान्य केले होते आणि पाचशे रुपये प्रमाणे 22 फ्लॅटचे अकरा हजार रुपये तलाठ्याला द्या, असे सांगून तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले होते. लाचलुचपत विभागाने शासकीय पंचासमक्ष केलेल्या पडताळणीमध्ये तलाठी भापकर आणि मंडलाधिकारी देवकाते यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंडलाधिकारी देवकाते यांच्याकडून पैसे हस्तगत करणे तसेच या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे म्हणणे तक्रारदाराच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या