Friday, May 24, 2024
Homeनगरकचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेचे गंठण ओरबडले

कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलेचे गंठण ओरबडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गाडीत कचरा (Garbage) टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण (Chain Snatching) दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबडले. सावेडी (Savedi) उपनगरात पाईपलाइन रस्त्यावर ज्ञानेश्वरनगरमध्ये ही घटना घडली. संगिता सतिष वारे (वय 53) यांचे गंठण ओरबडले असून त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

संगमनेरातील दूधगंगा पतसंस्थेत 98 कोटी 57 लाखांचा गैरव्यवहार

मंगळवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. संगिता राहत असलेल्या ज्ञानेश्वरनगरमधील घराच्या समोर मनपाची कचरा गाडी (Municipal Corporation Garbage Truck) आली होती. गाडीत कचरा टाकण्यासाठी त्या गेटजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने संधी साधून संगिता यांच्या गळ्यातील गंठण (Chain Snatching) ओरबडले. त्यांनी त्या चोरट्याचा हात पकडला असता त्याने हाताला झटका मारून धूम ठोकली. संगिता यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण चोरीला (Theft) गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भंडारदरा 70 टक्के भरण्याच्या मार्गावरVideo : नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात गाजला

- Advertisment -

ताज्या बातम्या