पेठ | प्रतिनिधी | Peth
नाशिक-पेठ-धरमपूर मार्गावर गेल्या २४ तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. काल सकाळी कोटंबी घाटात तिहेरी वाहनांच्या अपघातामुळे हा घाट बंद करण्यात आला. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले…
- Advertisement -
त्यानंतर आज सावळ घाटातील एका वळणावर मोठा ट्रेलर अडकून पडला आहे. त्यामुळे पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. या मार्गावरून मजुरीसाठी नाशिक, दिंडोरीकडे जाणाऱ्या नागरिक त्रस्त झाले आहेत. बंद पडलेल्या ट्रेलरखाखून मोटारसायकल आडवी करत जाण्याची वेळ दुचाकीधारकांवर आली आहे.