Friday, November 15, 2024
Homeराजकीय'आता राहुल गांधी नव्हे तर लाहोरी म्हणा', भाजप नेत्याची काँग्रेसवर टीका

‘आता राहुल गांधी नव्हे तर लाहोरी म्हणा’, भाजप नेत्याची काँग्रेसवर टीका

दिल्ली l Delhi

करोना परिस्थिती तसेच अर्थव्यवस्थेच्या झालेल्या घसरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींविरोधात आक्रमक होत टीका केली होती. ही टीका करताना राहुल गांधींनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे.

- Advertisement -

संबित पात्रा यांनी म्हंटले आहे, “भारताने राहुल गांधी यांचं नावं बदललं आहे. ते राहुल गांधी नाहीत, राहुल लाहोरी आहेत. कारण हा भाजपा व काँग्रेस असा विषय नाही. हा विषय भारत विरुद्ध पाकिस्तान असा आहे. बदनाम देशासोबत काँग्रेस भारताला का बदनाम करते आहे? भारत कोट्यवधी लोकांचा देश आहे, जिथे सर्व आनंदानं जगत आहेत. धर्माच्या कोणत्याही सीमा नाहीत. भारत एक लोकशाही देश आहे. तुम्ही पाकिस्तानशी तुलना करता. भारताविषयी तक्रारी करता. भारत भीक मागणाऱ्यांचा देश आहे असं म्हणता. याच वेगाने काम सुरू राहिलं, तर इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल” असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढणार आहे का?

काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पाकिस्तानमधील लाहोर लिटरेचर फेस्टिवलमध्ये मोदी सरकारवर भारतीय मुस्लिमांसोबत भेदभाव करण्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी शशी थरुर आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘आज (18 ऑक्टोबर) सकाळी शशी थरुर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाहोरमध्ये काय म्हटलं हे आम्ही ऐकलं. त्यावर विश्वास बसत नाही. त्यांनी लाहोर लिटरेचर फेस्टिवलमध्ये केवळ भारताची चेष्टा केली नाही, तर भारताटं वाईट चित्र उभं केलं,’ असा आरोप संबित पात्रा यांनी केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या