Monday, May 26, 2025
Homeदेश विदेशविरोधकांचं ऐक्य होत असतानाच, उत्तर प्रदेशमधील मोठा चेहरा NDA मध्ये सामील

विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, उत्तर प्रदेशमधील मोठा चेहरा NDA मध्ये सामील

दिल्ली | Delhi

- Advertisement -

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. त्याला यश मिळताना दिसत आहे.

उत्तरप्रदेशातील दिग्गज नेते तथा सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओपी राजभर (OP Rajbhar) यांनी पुन्हा एनडीएत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने निवडणुकीआधी भाजपाला टॉनिकच मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर शाह यांनी ट्विट करत राजभर हे एनडीएमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे. शाह यांनी राजभरबरोबरील फोटो शेअर करत राजभर यांचे एनडीए परिवारात स्वागत करत आहोत, असे ट्विट केले आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता राजभर लवकरच भाजपाबरोबर जातील अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह यांनी ट्विट केल्यानंतर राजभर एनडीएत दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज राजभर स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती देणार असल्याचे समजते.

सचिन तेंडुलकरांच्या ‘या’ कृत्यावर बच्चू कडूंचा थेट आक्षेप; लिहिलं खुलं पत्र

कोण आहेत ओम प्रकाश राजभर?

ओम प्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशमधील जहूराबादमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. तसंच 2017 ला ते जहूराबादमधूनच विधानसभेचे सदस्य अर्थात आमदार होते. ते योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. 19 मार्च 2017 ला ते मागासवर्ग कल्याण विभाग आणि अपंग लोक विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री होते. पण त्या काळात ओम प्रकाश राजभर यांच्यावर युती धर्म मोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. 20 मे 2019 ला त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलं. मग 2022 ला त्यांना सपासोबत जात निवडणूक लढली होती.

दरम्यान, ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांची साथ सोडल्याने हा समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहेत. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर देणाऱ्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षालाही गळती लागली आहे. समाजवादी पक्षातील बडे नेते आणि मऊमधील घोसी विधानसभा मतदारसंघातील आमदार दारा सिंह चौहान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दारा सिंह चौहान यांनी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. आता दारा सिंह चौहान हे पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार पाऊस कोसळला. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या पावसाचा जोर...