Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशJEE-NEET - न्यायालयाने याचिका फेटाळली : या तारखांना परीक्षा

JEE-NEET – न्यायालयाने याचिका फेटाळली : या तारखांना परीक्षा

नीट आणि जेईई (मेन)JEE-NEET परीक्षांच्याआयोजनसंदर्भात सहा राज्यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. १७ ऑगस्ट रोजीच्या न्यायालयाच्या आदेशावर सहा राज्यांच्या मंत्र्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

नीट आणि जेईई (मेन)JEE-NEET या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेत १७ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड व महाराष्ट्राने ही याचिका दाखल केली होती. आता नीट-यूजी परीक्षा १३ सप्टेंबरपासून होणार आहे. जेईई मेन १ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या